![]()
८० लाख रुपयांच्या पाणंदरस्ते कामाचा शुभारंभ
जयसिंगपूर : प्रतिनिधी
चिंचवाड ही माझी जन्मभूमी व कर्मभूमी आहे. गावातील रस्ते, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा या सारख्या पायाभूत सुविधा महत्वाच्या आहेत.चिंचवाड गावच्या सर्वांगीण विकासासाठी श्री गुरुदत्त शुगर्स च्या माध्यमातून जास्तीत – जास्त मदत करण्यासोबतच राज्य व केंद्र शासनाचा निधी उपलब्ध करून गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन श्री गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी केले. चिंचवाड येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते टप्पा क्र. ११६ अंतर्गत ८० लाख रुपयांच्या रस्त्यांच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात श्री. घाटगे बोलत होते.

यावेळी बोलताना श्री. घाटगे म्हणाले, चिंचवाड गावच्या विकासासाठी प्रत्येकांनी गट तट न पाहता व राजकारण न करता एकत्र येऊन काम करावे. मंजूर झालेले पाणंद रस्ते पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी वाद न करता समजुतदारपणा दाखवत रस्ते पूर्ण करण्यास सहकार्य करावे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यातून प्रमुख जिल्हा मार्ग – १२३ चिंचवाड ते दत्त कारखाना बस स्टॉप या रस्त्यासाठी साडेआठ कोटी रुपये मंजूर झाले असून प्रत्यक्षात रस्त्याचे काम देखील सुरू आहे. पुढील काळात गावच्या विकासासाठी जास्तीत – जास्त मदत करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी श्री. घाटगे यांनी दिली.
यावेळी कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळक, दत्त मिल्क व फूडर्स चे डायरेक्टर आदित्य घाटगे, गुरुदत्त शुगर्सचे संचालक शिवाजीराव माने- देशमुख, शिवाजी जाधव-सांगळे,भाजपचे मंडल अध्यक्ष महेश देवताळे,चिंचवाडचे सरपंच जालिंदर ठोमके, उपसरपंच विठ्ठल गोधडे ,आम्माण्णा ककडे, माजी सरपंच विठ्ठल घाटगे, अजित चौगुले, मनोहर गोधडे,पंतगराव गोधडे,कुमार माने, महादेव गुरव, ज्योती गोधडे, केशव घाटगे, सचिन पाटोळे, शरद गोधडे,पोपट कदम, बबन घाटगे, सदाशिव आंबी ,अन्वर जमादार,सुरेश सासणे,श्याम बंडगर, ग्रा.म.पंचायतीचे सर्व सदस्य, विविध संस्थाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते .
