सौ. शैला सावंत दानोळीतून जिल्हा परिषद लढणार

Loading

दानोळी : प्रतिनिधी

होऊ घातलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेची निवडणूक दानोळी मतदारसंघातून सौ शैला रवींद्र सावंत या लढवणार आहेत. निमशिरगाव तालुका शिरोळ येथील त्या रहिवाशी आहेत तर दानोळी हे त्यांचे माहेर आहे. शिक्षण पूर्ण झाल्यापासून त्यांनी समाजाच्या सर्वांगीण कामात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. मतदारसंघातील महिला वर्गात त्या प्रसिद्ध आहेत. महिलांसाठी वैविध्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या सौ शैला यांचा थेट लोकांशी संवाद आहे. ग्रामीण भागात महिलांचे एकत्रीकरण, जागृती, संघटन, सबलीकरण अशा विविध प्रक्रियेमध्ये त्यांनी दिलेले निर्णय महत्त्वाचे ठरले आहेत. एक प्रकारे त्या महिला वर्गाच्या मार्गदर्शिका म्हणून ओळखल्या जातात.

त्यांच्या विविध आणखी कामाचा प्रभाव जनतेवर दिसत असून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळणार आहे असा आत्मविश्वास ही त्यांच्या ठाई दिसून येतो. त्यामुळे धावणारी जिल्हा परिषद मतदार संघातून ही उच्चशिक्षित सौ शैला सावंत राखीव असलेल्या जागेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवत आहेत.