![]()
जयसिंगपूर / प्रतिनिधी
माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस सोमवारी उत्साहाने साजरा करण्यात आला. सकाळी आठ वाजल्यापासून जयसिंगपूर येथील सहाव्या गल्लीत यड्रावकर यांच्या निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, उद्योगपती, सामाजिक आणि सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, नागरिक यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.
तत्पूर्वी सकाळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पार्वती औद्योगिक वसाहत येथे स्वर्गीय शामरावआण्णा पाटील यड्रावकर यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन स्वर्गीय आण्णांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि पुष्पगुच्छ वाहिले. त्यानंतर निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोठी गर्दी झाली होती. प्रारंभी यड्रावकर उद्योग समूह व यड्रावकर कुटुंबाच्या वतीने संजय पाटील यड्रावकर यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी उद्योगपती संजय घोडावत, उद्योगपती अण्णासाहेब चकोते, नवीद मुश्रीफ, पी.एम. पाटील, भालचंद्र पाटील, रावसाहेब पाटील, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, सावकार मादनाईक यांच्यासह शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, विविध सेवा सोसायटीचे चेअरमन व पदाधिकारी यांच्यासह शिरोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शुभेच्छा दिल्या.
आमदार यड्रावकर यांना भ्रमणध्वनी वरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार अरुण लाड, आमदार जयंत आसगावकर, ए. वाय. पाटील, माधवराव घाटगे, संजय मंडलिक, मयूर उद्योग समूहाचे संजय पाटील, अरुण डोंगळे, शरद लाड, मुरलीधर जाधव, विजय देवणे, विजय भोजे, जोगेंद्र कबाडे, राजाराम कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर मेंढे, पुंडलिक जाधव, अनिल बागणे, युवराज पाटील, इंगळेश्वर महाराज (कर्नाटक) यांनी शुभेच्छा दिल्या.


