![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी
जयसिंगपूर नगरपरिषदेच्या प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला वेग आला असून प्रभाग क्रमांक ४ मधून अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या उच्चशिक्षित उमेदवार ॲड.यशोदा शितल कांबळे यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या वाढत्या जनसंपर्कामुळे विरोधी गटातील उमेदवारांची धांदल उडाल्याचे दिसून येत आहे
प्रचारादरम्यान ॲड.कांबळे यांनी प्रभागातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.प्रत्येकाला प्रॉपर्टी कार्ड,पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा तसेच महिलांच्या सुरक्षेसह विविध प्रश्नांवर त्या विशेष लक्ष देणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.

गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षणमान उंचावण्यासाठी ठोस उपाययोजना राबवणार असल्याचे सांगत त्या म्हणाल्या की, “प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांना आवश्यक सुविधा मिळणे हेच माझे प्राधान्य राहील.”
प्रचार मोहीमेदरम्यान अनेक नागरिकांनी त्यांना भरभरून पाठिंबा दर्शवला.मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी उमेदवारांच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला.
मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता प्रभागातील जनता उच्चशिक्षित असणाऱ्या उमेदवाराला निवडून देईल की अशिक्षित उमेदवाराच्या पाठीशी राहील हे पाहणे या प्रभागात महत्त्वाचे ठरणार आहे.