![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी –
जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८ मध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीच्या प्रचार फेरीला प्रचंड उत्साहाने प्रतिसाद मिळाला. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर तसेच प्रभाग ८ चे उमेदवार पराग पाटील व उज्वला उत्तम वाघवेकर यांनी काढलेल्या प्रचार फेरीत मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले. जयसिंगपूर शहराला विकासाचे मॉडेल बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शाहू आघाडीच्या सर्वच उमेदवारांना निवडून देण्याची ग्वाही मतदारांनी दिली.
प्रचार फेरीदरम्यान उमेदवारांनी प्रभागातील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूरचा सर्वांगीण विकास हीच आमची प्रामाणिक बांधिलकी, असे सांगत आगामी कामकाजाचा रोडमॅप मांडला. पराग पाटील व उज्वला वाघवेकर यांनी प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि महिलांसाठी नव्या योजनांची माहिती देत जनसंपर्क साधला.
या प्रचार फेरीत प्रभाग ८ मधील नागरिकांनी उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत आघाडीला भक्कम पाठिंबा दर्शवला. जयसिंगपूरचा विकास यापुढेही अखंडित राहावा, यासाठी मतदारांनी शाहू आघाडीच्या उमेदवारांना नगरपालिकेत पाठवण्याचा निर्धार व्यक्त केला. युवा मतदारांची उपस्थितीही विशेषत्वाने जाणवली.
या प्रचार फेरीत सावकार मादनाईक, संभाजी मोरे, शिवाजी कुंभार,डॉ.अतिक पटेल, वतन पठाण, मिलिंद भिडे, रमेश यळगुडकर, मिलिंद शिंदे, उत्तम वाघवेकर,सुभाष हाबळे, राजू वाघवेकर, पद्मा कोठावळे, सायली सावंत, पवित्रा सावंत, पद्मा सुरवशी, अभी सावंत, विकी गायकवाड, संतोष सासने, योगेश वाघवेकर, अक्षय सावंत,ऋतुराज कोठावळे, अमोल कोठावळे, अमित कोठावळे, सुनिल सासने, राजू सासने, दीपक केदार,संकेत मगदूम,यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.


