संजय पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली जयसिंगपूरमध्ये दमदार प्रचार फेरी; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संजय पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली जयसिंगपूरमध्ये दमदार प्रचार फेरी; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Loading

जयसिंगपूर : प्रतिनिधी
जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगत असताना राजश्री शाहू विकास आघाडीने रविवारी आपली प्रचार मोहीम दमदार पद्धतीने सुरू केली. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवक पदांचे उमेदवार, पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या प्रचार फेरीत विविध ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांचे स्वागत केले.

कार्यकर्त्यांमध्ये जोशपूर्ण वातावरण होते. जयघोषांच्या वातावरणात फेरीची सुरुवात झाली. स्थानिक बाजारपेठ, मुख्य चौक, तसेच प्रभागातून नागरिकांनी उमेदवारांशी प्रत्यक्ष संवाद साधत प्रचार फेरी काढण्यात आली. अनेक ठिकाणी औक्षण आपल्या प्रभागात उमेदवारांचे स्वागत केले.

या वेळी संजय पाटील यड्रावकर यांनी नागरिकांना संबोधित करताना, जयसिंगपूर शहराचा सर्वांगीण विकास यापुढे असेच सुरू ठेवणे हे ध्येय असून, आतापर्यंत केलेल्या कामांची पुढील पायरी अधिक भक्कम करण्यासाठी जनतेचा पाठिंबा महत्त्वाचा आहे, असे नमूद केले. त्यांनी पुढे सांगितले की शहराचा विकास थांबू देणार नाही, जनता सोबत असेल तर अधिक वेगाने शहराचा विकास करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रचार फेरीदरम्यान नागरिकांमध्ये उमेदवारांविषयी उत्सुकता दिसून आली. विशेषतः युवक आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता. विविध विभागांतील नगरसेवक पदाचे उमेदवार नागरिकांशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्नांची माहिती घेत होते. या प्रचार फेरीमुळे राजश्री शाहू विकास आघाडीने निवडणूक प्रचाराला प्रारंभापासूनच जोरदार चालना दिली असल्याचे चित्र निर्माण झाले.
याप्रसंगी ॲड. प्रसाद नाईक, संभाजी मोरे, शिवाजी कुंभार शामराव बंडगर, संजय कुलकर्णी, मिलिंद भिडे, रमेश यळगुडकर, अजित उपाध्ये, संजय उर्फ पांडू सारस्वत, सुनील मजलेकर, पराग पाटील, गणेश गायकवाड, अभिजीत भांदिगरे, साजीदा घोरी, कबीर गवंडी, जुलेखा मुलानी, वीरेंद्रसिंह निकम, संदीप दानोळे, जमीर मिस्त्री, सुरज शिंगाडे, सुजित दानोळे जावेद शेख त्यांच्यासह सर्व उमेदवार व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.