विनय पाटील यांचा विकास कामांच्या जोरावर विजय निश्चित!

Loading

विकासाचं वचन, विश्वासाचं नातं

कोते : प्रतिनिधी

राशिवडे बुद्रुक जि. प. मतदार संघात विनय राजेंद्र पाटील यांनी लाखोंची विकास कामे केली आहेत. प्रत्येक गावात त्यांनी निधी देऊन विकास कामे केली आहेत. त्यामुळे त्यांनी मतदार संघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर त्यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे. मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते हे पुर्ण ताकदीनिशी उमेदवार विनय पाटील यांच्या पाठीशी आहे. आत्तापासूनच राशीवडेसह ग्रामीण भागातील कार्यकर्ते हे जोमाने त्यांचा प्रचार करीत आहेत.
सामाजिक बांधिलकी आणि विकासाभिमुख दृष्टीकोनामुळे ते जनतेमध्ये लोकप्रिय असून, ग्रामीण भागातील विकासासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.

मतदार संघात ‘विकास’बोलतोय

ओढ्यावरील पुल, मोहरी, भूमिगत गटार योजना, रस्ते, पाणी पुरवठा योजना, दलित वस्ती, ओपनस्पेसचा विकास, मंदिर परिसरासाठी आणलेला निधी, पर्यटन विकासासाठी त्यांनी मोठ्याप्रमाणात निधी आणला आहे. त्यामुळे वाड्यावस्तीवरील ग्रामस्थ, शेतकर्‍यांना मोठा लाभ झाला आहे. शिक्षण, आरोग्य यांसारख्या विकासकामांवर त्यांचे बारीक लक्ष आहे, तर ग्रामीण भागात शेती, पाणीटंचाई, सिंचन आणि वीज यांसारख्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात.विनय पाटील म्हणजे विकास असे सुत्र झाले आहे.

विकासाचं वचन, विश्वासाचं नातं!”
या घोषवाक्याखाली ते लोकांशी थेट संवाद साधत असून, त्यांच्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये शिक्षण, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस उपक्रम राबविण्याचा त्यांचा संकल्प आहे.

“विकास हा प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे. लोकांचा विश्वास हीच माझी ताकद आहे आणि त्या विश्वासाला न्याय देण्यासाठी मी पुन्हा जनतेच्या सेवेत उतरलो आहे.”माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते पाठीशी उभा राहून या मतदारसंघात इतिहास घडवतात. हा इतिहास घडविणाऱ्या मंडळींचा मला सार्थ अभिमान आहे. या निवडणुकीमध्ये आपल्याला अतिशय ताकदीने आणि ठरवलेल्या नियोजनानुसार काम करायचे आहे. आपल्याला मोठे यश मिळणार आहे.

विनय राजेंद्र पाटील, उमेदवार