![]()
कोल्हापूर येथे लोकशाही व संविधान सन्मान महामोर्चा चे आयोजन

कोल्हापूर : प्रतिनिधी
सहा ऑक्टोबर रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायाधीशांवर एका तथाकथित मनुवादी वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला ही बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. सर्वोच्च न्यायव्यवस्थेचा संविधानाचा आणि भारतीय लोकशाहीचा हा अपमान असून देशद्रोह आहे. असे असताना सरकारकडून या देशद्रोही वकिलाविरुद्ध कोणत्याही प्रकारे तक्रार झाली नाही राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा देखील दाखल केला नाही. संसदेत आणि राज्याच्या विधानसभेत यावर चर्चा सुद्धा झाली नाही संविधानिक व लोकशाहीला पोषक अशी भूमिका न घेता देशद्रोही वकिलास हिरो म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न केला हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत धोकादायक आहे. आपले हक्क अधिकार आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल तर लोकशाही टिकली पाहिजे त्याचबरोबर देशाचे संविधान सुरक्षित राहिली पाहिजे आणि संविधानिक मूल्य जोपासण्यासाठी संविधानाची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे यासह एक दिवस देशासाठी लोकशाही व संविधान सन्मान महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून कोल्हापूर येथे सोमवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता बिंदू चौकातून हा महामोर्चास प्रारंभ होत आहे.
या देशात मनुवादी व्यवस्थेने वारंवार लोकशाही व संविधान विरोधी भूमिका घेतली असून परिणामी आज भारतीय लोकशाही धोक्यात आली आहे. भारतीय नागरिकांचे हक्क अधिकार आणि स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. सरकारकडून वेगवेगळे कायदे शासन निर्णय करून नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. जन सुरक्षा विधेयकाच्या नावाखाली शहरी नक्षलवाद भासून हे देशहिताचे भूमिका घेणारे अनेक राष्ट्रवादी, लोकशाहीवादी, मानवतावादी व पुरोगामी विचारवंतांच्या विरोधी कटकारस्थानी करून दबाव टाकला जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आज देशभर गळचेपी होत आहे.
धर्मनिरपेक्षतेला विरोध करून धार्मिक राष्ट्रवादीची भूमिका घेतली जात असून धार्मिक व जातीय ध्रुवीकरण घडवून आणले जात आहे. एकूणच भारतीय नागरिकांना लोकशाही हवी की हुकूमशाही? तुम्हाला हक्क अधिकाराचे स्वातंत्र्य हवे की स्वातंत्र्य की पारतंत्र्य? असे प्रश्न उपस्थित करीत एक दिवस देशासाठी आपणही या आणि इतरांनाही आणा, सर्वांनी या लाखोंच्या संख्येने सामील व्हा असे आवाहन लोकशाही व संविधान सन्मान महामोर्चा आयोजकांनी केले आहे.
आवाहनकर्त्यांमध्ये आरपीआयचे गवई गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव शिंदे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष निवास सडोलीकर, भुदरगड तालुका अध्यक्ष बाळासाहेब बेगवडेकर आणि कामगार आघाडीचे तालुका अध्यक्ष शिवाजी म्हसवेकर यांचा समावेश आहे.