![]()
रुई जि.प.मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने संपर्क सत्र प्रारंभ

हातकणंगले : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार अण्णा बनसोडे यांचे निकटवर्तीय हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर यांचे विश्वासू शिलेदार डॉ.विशाल साजणीकर यांनी गेली सहा महिने रुई जिल्हा परिषद मतदार संघामध्ये तयारी चालू केली असून रुई जिल्हा परिषद मतदार संघ राखीव होण्याचे संकेत सफल म्हणजेच अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यामुळे जनसंवाद प्रारंभ झाला असून विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या गनिमी काव्याने आणि मार्गदर्शनाने मतदारसंघांमध्ये भेटीगाठी अंतर्गत चर्चा विशाल साजणीकर यांचेकडून चालू असल्याचे निदर्शनास येत आहे.
या मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडी यांच्याकडे प्रबळ मतदारसंघातील उमेदवार नसल्याने मतदारसंघाचे प्रबळ उमेदवार म्हणून डॉ. विशाल साजणीकर यांना मतदारसंघात पसंती दिली जात आहे तसेच माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर यांच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष ते मतदारसंघांमध्ये काम करत आहेत याचा फायदाही त्यांना होऊ शकतो सध्या महायुती आणि महाविकास आघाडी हे उसने उमेदवार आणणार असल्याची जोरदार चर्चा चालू आहे. या सर्वाचा फायदा विशाल साजणीकर यांना होऊन ते या मतदारसंघातून बाजी मारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रुई जिल्हा परिषद मतदार संघातील काही निवडक लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर डॉ.साजणीकर हे या मतदारसंघाचे दावेदार असल्याची जोरदार चर्चा आहे.