![]()
शिक्षक टिकवण्यासाठी संघटनेच्या पाठीशी राहा : साहित्यिक डॉ.सुनीलकुमार लवटे

आजरा : प्रतिनिधी-
शिक्षक टिकण्यासाठी संघटनेच्या पाठीशी सर्वांनी उभे राहिले पाहिजे असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले. कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी डॉ. लवटे बोलत होते. आदर्श शिक्षक 2025 पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर येथील मुख्याध्यापक संघ सभागृहामध्ये संपन्न झाला. आजरा महाविद्यालयाचे उपप्राचार्य दिलीप संकपाळ यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील 15 शिक्षकांना या पुरस्काराने यावेळी गौरवण्यात आले. डॉ सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते गौरव मूर्तींना सन्मानित करण्यात आले. शाल शिल्ड सन्मानपत्र सन्मानचिन्ह भगवत गीता ग्रंथ आणि गुलाब पुष्प असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अध्यक्षीय भाषणात प्रा एस बी उमाटे यांनी संघटनेचे महत्त्व विशद करून नवीन वेतनश्रेणी डी एच इ मुळे उप प्राचार्य पदी निवड झाल्याचे सांगितले. तर आज मितिला नवीन वेतनश्रेणी, सेवा शाश्वती आणि वेतन वाढ या सर्व सुविधा आपणास प्राप्त झाल्या आहेत असा अभिमान व्यक्त करीत आज पर्यंत आपण केलेल्या आंदोलनांपेक्षाही मोठी आंदोलने करावी लागतील असा तयारीचा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी जिल्हा संघाचे उपाध्यक्ष प्रा विठ्ठल नाईक प्रा संग्राम पाटील प्रा विनायक चव्हाण प्रा विनायक पाटील प्रा एच बी जवळे, प्रा राहुल बुनाद्रे, प्रा पी बी रक्ताडे, प्रा एस एम निळकंठ, प्रा सौ रश्मी यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्ह्यातील सुमारे पाचशे पेक्षाही अधिक शिक्षकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. प्रा बी एस पाटील यांनी प्रास्ताविक केले, प्रा सी व्ही पुंड, प्रा सी व्ही जाधव, प्रा एस व्ही गुरबे, प्रा पी डी पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांचा परिचय प्रा सी एम गायकवाड यांनी करून दिला. सूत्रसंचालन एस जी जांभळे यांनी केले तर आभार प्रा ए बी बागडी यांनी मानले.