डॉ.जे.जे.मगदुम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये वुमेन सेल आणि आयसीसी सेल सुरु

Loading

  “महिला सबलीकरण: मिथ आणि वास्तव” या विषयावर डॉ.प्रतिभा देसाई यांचे प्रतिपादन  

जयसिंगपूर : प्रतिनिधी

-खरे महिला सबलीकरसाठी संतुलित, सर्वसमावेशक वातावरण आणि सर्वांचा सहभाग आवश्यक आहे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील डॉ.प्रतिभा देसाई यांनी केले.येथील येथील डॉ.जे.जे.मगदुम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वुमेन सेल आणि आय.सी.सी.सेलचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर येथील डॉ.प्रतिभा देसाई यांच्या हस्ते,प्राचार्या डॉ.एस.बी.पाटील आणि वुमेन सेल व आय.सी सी.समन्वयक डॉ.एस.एम.अत्तार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. त्यावेळी डॉ.देसाई बोलत होत्या.तर या कार्यक्रमाचे औचित्य साधून”महिलासबलीकरण:मिथ आणिवास्तव” या विषयावरती व्याख्यान संपन्न झाले.वुमेन सेल हे फक्त महिलांसाठी नसून,त्यात मुलांचा सहभाग महत्त्वाचा असेही डॉ.देसाई म्हणाल्या.प्राचार्या डॉ. एस.बी.पाटील यांनी समाजाच्या सर्वक्षेत्रांमध्ये महिलांची वाढती भूमिका अधोरेखित करताना महिलांच्या शिक्षणाचे आणि सर्व क्षेत्रांतील समान संधींचे महत्त्व स्पष्ट केले.यावेळी डॉ.एस.एम.अत्तार यांनी हा उपक्रम महिलांच्या सबलीकरणासाठी,सुरक्षितते साठीआणि समानता व आदराच्या वातावरण निर्मितीसाठी,शक्ती,सन्मानआणि प्रत्येक महिलेसाठी सुरक्षितता व आधार वचन बद्धताप्रतीक आहे.असे सांगितले.ट्रस्टचे चेअरमन डॉ.विजय मगदूम,व्हाईस चेअरपर्सन डॉ.सोनाली मगदूम,कार्यकारी संचालक डॉ.सुनील आडमुठे यांच्या प्रेरणेतून,वुमेन सेलप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समिती सदस्यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व महिला कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.आभार प्रा.अश्विनी पाटील यांनी मांनले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *