जयसिंगपूरात मटक्यावर कारवाई ; ४ हजार ९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त

Loading

जयसिंगपूर : प्रतिनिधी
जयसिंगपूर शहरातील गल्ली नंबर १०, भजी चौपाटी परिसरात मटका सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा,कोल्हापूर यांनी सोमवारी (दि.१३ ऑक्टोबर २०२५) कारवाई करत एकाला ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण ₹४,०९५ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आर्यन शौकत अत्तार (वय २०, रा. गल्ली नंबर ११, जयसिंगपूर) असे आहे. तो स्वतःच्या फायद्यासाठी बिगर परवाना मटका घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली असून, याबाबतची फिर्याद पोलीस नाईक महेश सखाराम खोत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर) यांनी दिली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पो.ना. पाटील हे करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *