![]()
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती
जयसिंगपूर : प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याचा त्रास कमी करून त्यांच्या शेती विकासाला गती मिळावी, या उद्देशाने शिरोळ तालुक्यातील २४ गावांसाठी ५१ किलोमीटर पाणंद रस्त्यांना शासन मान्यता मिळाली आहे. ही मंजुरी मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना अंतर्गत देण्यात आली असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेंतर्गत शिरोळ तालुक्यात २४ गावे आणि हातकणंगले तालुक्यात २ गावातील ७ किमी पाणंद रस्त्यांचा समावेश आहे. याआधीही आमदार यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यासाठी ३९६ किलोमीटर पाणंद रस्त्यांना मंजुरी मिळवली होती. त्या कामांना सध्या गती मिळाली असून, आता नव्या टप्प्यात आणखी ५१ किमी रस्त्यांची भर पडली आहे.
या मंजुरीबद्दल आमदार यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांचे आभार मानले आहेत.
शिरोळ तालुक्यातील कवठेगुलंद – रावसो गडगले ते अभिजीत कुंभोंजे शेत रस्ता, अब्दुललाट – काकासो सिदगोड़ा पाटील शेत ते पोपट आक्कोळे शेत, रामगोंडा पाटील शेत ते मारुती कुंभार शेत, आण्णासो पाटील शेत ते विठ्ठल पाटील शेत, कल्लाप्पा बेळकुडे ते दत्ता आरगे शेत, खुरपे ते पाचवा मळा रस्ता, कारदगे शेत ते आदगोंड पाटील शेत, टाकळी – भिमराव पाटील ते बाळकृष्ण पाटील, प्रशांत मिरजे ते बाळकृष्ण पाटील, दत्तवाड – कोटलिंग ते खडकोळी रस्ता, दत्तवाड-घोसरवाड रोड ते थोरला मळा, शिरदवाड – मोहन परिट ते अक्षय चावरे शेत, आण्णासो वसवाडे ते बाळासो मगदूम शेत, गायकवाड घर ते प्रशांत पट्टणकुडे शेत, तेरवाड – अमृत चोपडे ते बाबू राजमाने शेत, नवे दानवाड – अनिल कुन्नुरे शेत ते मोहनसिंग रजपूत शेत, कवठेसार – पाणीपुरवठा ते जुने कवठेसार, आण्णा माणगावे शेत ते अभय तेरदाळे शेत, डोंबिरी पाणंद रस्ता, दिलीप दळवी शेत ते संदीप गाडवे शेत, जॅकवेल पाणंद रस्ता, कोथळी – बाबूराव इंगळे शेत ते शांतीनाथ नांदणे शेत, राजगोंड शामगोंडा ते नदीपाणवठा, धनपाल खवाटे ते भरत खवाटे शेत, निमशिरगाव – दानोळी रस्ता ते कोळी वस्ती, स्मशानभूमी ते रेल्वेगेट, रेल्वेगेट ते धर्मनगर मार्गे गट नं. ४९१, चिपरी – चौगुले पाणंद रस्ता, तात्यासो पाटील ते कागले मळा, साखरपा पाणंद रस्ता ते धर्मनगर, उमळवाड – दानोळी रस्ता ते दत्ता कुंभार शेत, बंडू मगदूम शेत, महावीर चौगुले शेत, नरसू मगदूम शेत, चिंचवाड – शिरोळ-चिंचवाड ते पालवाड (आडरस्ता), म्हसोबा मंदिर ते राजाराम कदम (तिरंगा चौक) रस्ता, कनवाड – मुस्लिम कब्रस्तान ते पंचगंगा जॅकवेल सता, नाईक मामा मळा ते रमेश माणगावे शेत.
गणेशवाडी – बाळू खोत ते सोमाणे शेत, खोत बीराजे शेत, कुंभार उदगांवे मळा, शेडशाळ – कैलास गडगे शेत ते लक्ष्मी मंदिर गाताडे कॉर्नर, पाटील मळा मार्ग, शिरढोण – खंजिरे पाणंद रस्ता, राजापूर – मंगरायावाडी रस्ता, कुंभार शेत ते स्वामी रस्ता, जुने दानवाड – स्मशानभूमी ते गुरव शेत व मळीकवाडे शेत, अकिवाट – इकबाल बहुरुपी शेत ते विद्यासागर रायनाडे शेत, घालवाड – सागर उमाजे शेत ते बाबासो जुगळे शेत, विशाल आवटी शेत ते आण्णाप्पा पाणदारे शेत, सरकार मळा ते मदन मस्के शेत, अशोक जाधव तळ ते उदगाव नाला, शिरटी – कवठेगुलंद ते कुटवाड रस्ता, वजीर बाबा दर्गा मळा, औरवाड – गाव मर्यादेतील पाणंद रस्ता, कवठेगुलंद – कागवाड रस्ता ते अनुसूचित जाती मागासवर्गीय शेतीकडे जाणारा रस्ता, दत्त सोसायटी ते राजमाने शेत.
तर हातकणंगले तालुक्यातील ७ किमी पाणंद रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे.
