![]()
शुक्रवारी एक दिवसाचे आयोजन : देश, परदेशातून तज्ञांचे मार्गदर्शन

यड्राव : प्रतिनिधी
येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व सीईओपी टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कृषी तंत्रज्ञान हस्तांतरण’ या विषयावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा शुक्रवार (ता.१०) रोजी शरद इंजिनिअरिंगवर होणार आहे.
कार्यक्रमाचे उदघाटन सीईओपी विद्यापीठीचे कुलगुरु डॉ. सुनिल भिरुड, शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या प्रमुख उपस्थीतीत होणार आहे.
त्यानंतर समन्वयक डॉ. एस.एस. परदेशी हे प्रकल्पा विषयी माहिती देतील. त्यानंतर आशिया पॅसिफिक युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन (एपीयू) मलेशियाचे विनेश तिरुचेल्वम हे ऑनलाईन मलेशियामध्ये प्रगत कृषी उत्पादन आणि वितरण या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
त्यानंतर डॉ. एन. के. चौगुले हे भारतीय शाश्वत जैवऊर्जा दृष्टीकोन, राहुल इघे – बायोमास एनर्जी कन्व्हर्जन टेक्नॉलॉजीज, डॉ. तुळशीदास बस्तेवाड- ऊस पिकासाठी शेती यांत्रिकीकरण, डॉ. चंद्रकांत साळुखे – बांबू उद्योगातील नवीन ट्रेंड याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.