![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी –

येथील डॉ. जे. जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमध्ये डॉ. प्रभा जे. मगदूम ग्रंथालयामार्फत अभिजात मराठी दिवस व सप्ताह साजरी करण्यात येत असून या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी ज्ञानेश्वरी, रामायण, भगवद्गीता व संविधान पुस्तक पूजन करण्यात आले. उदघाट्न प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील यांनी केले. तर यावेळी अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्याचे घोषित करण्यात आले. ग्रंथालयातील उपलब्ध ग्रंथ संपदेचे प्रदर्शन, विद्यार्थी व स्टाफ वाचकांसाठी नवीन मराठी ग्रंथांचे प्रदर्शन, मराठी पुस्तक वाचन स्पर्धा, वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा व ” मराठीची थोरवी ” या विषयावर व्याख्यान होत आहे. तर मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी, भाषा संवर्धन होण्यासाठी जनजागृती आवश्यक असून प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासणे गरजेचे आहे, ग्रंथालयाच्या, जास्तीत जास्त वापरासाठी ग्रंथालयाने प्रयत्न केले पाहिजेत असे सांगून प्राध्यापकांच्यासाठी प्रति आठवड्यातून एक तास ग्रंथालय भेट झाली पाहिजे असे प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील यावेळी म्हणाल्या.
ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम, कार्यकारी संचालक डॉ सुनील आडमुठे यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम होत असून यावेळी प्रा. पी. पी. पाटील, प्रा. अमित साजने, विभागप्रमुख प्रवीण कोठावळे, राजेश भारतीय, डॉ. चौगुले, डॉ. तेजश्री मोहिते, डॉ. संतोष मोरे, प्रा. रोहित माने, कदम यासह प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. ग्रंथपाल डी. आर. माने यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. बी.एन. कुंभार, सौ. एस. एस. मगदूम, सौ. रुपाली कदम व पांडुरंग शिंदे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
याप्रसंगी डॉ. एस. बी. पाटील (प्राचार्या), प्रा. पी. पी. पाटील, अमित साजणे, राजेश भारतीय, सौरभ खानावळे, रोहित माने, डी. आर. माने, प्रविण कोठावळे, डॉ. मोहिते, डॉ. चौगुले ,प्राध्यापक, ग्रंथालय स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.