व्यंकटराव शिक्षण संकुलात राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन

Loading

आजरा : प्रतिनिधी

येथील व्यंकटराव शिक्षण संकुलात राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त यांच्या प्रतिमेचे पूजन आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे संचालक पांडुरंग जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव अभिषेक शिंपी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रथम व्यंकटराव परिवारातर्फे विजयादशमीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या सणाचा एक योगायोग असा आहे की सत्याचा असत्यावर विजय असा हा दिवस असून ज्या गांधीजींनी सत्याचा मार्ग दाखवला त्या गांधीजींबद्दल आज समाजामध्ये खोटे- नाटे पसरवून छोटी छोटी मुलं त्यांच्याबद्दल उद्विग्न भावना व्यक्त करताताना दिसत आहेत. गांधीजींचा खोटा इतिहास पसरवला जात आहे. गांधींजींचे खरे विचार या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य आपण सर्व शिक्षक जबाबदारी पूर्वक व प्रामाणिकपणे करणे गरजेचे आहे. हा विचार खऱ्या अर्थाने मुलांपर्यंत पोहोचवायचे कार्य शिक्षिकांवर अवलंबून आहे. त्याचबरोबर तोच विचार देशाला आणि समाजाला पुढे नेणारा आहे. हे युवा खऱ्या अर्थाने देशाचे भविष्य आहेत. एकमेकांवर ईर्षा करण्यापेक्षा साधी रहाणी, खेड्याकडे चला, कृषी संसाधनाला महत्त्व द्या. हे महात्मा गांधीजींनी आचरणातून शिकविले. गांधीजी फक्त स्वातंत्र्य सैनिकच नव्हते तर ते तत्त्ववादी, मानवतावादी, अहिंसावादी अशा विचाराचे पुरस्कर्ते होते. त्यांनी मांडलेल्या आणि जगलेल्या तत्त्वांचा विचार समाजातील शेवटच्या घटकालाही पुढे नेणारा आहे. असे प्रतिपादन केले.

सौ एन.सी.हरेर यांनीही आपल्या मनोगतातून राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे जीवन कार्य कथन केले. यावेळी संस्थेचे संचालक कृष्णा पटेकर, सचिन शिंपी, सुधीर जाधव,प्राचार्य एम.एम. नागुर्डेकर,पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे.शेलार,प्राथमिक मुख्याध्यापक आर. व्ही.देसाई, शिवाजी पारळे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य पन्हाळकर सर, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन सौ.एल.पी.कुंभार, प्रास्तविक पी. व्ही. पाटील यांनी केले तर आभार एन.एन.पाष्ठे यांनी मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *