![]()
इचलकरंजी : प्रतिनिधी –

इचलकरंजीची वस्त्रनगरी अशी जरी ओळख असली तरी या शहराने क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. हे शहर प्रतिभांनी भरलेले असून संगीत क्षेत्रातील प्रतिभावान मुले वस्त्रनगरीचे नांव नक्कीच उजळतील. त्यांना एका व्यासपीठाची गरज आहे. आणि स्वरांश संगीत क्लासेसच्या माध्यमातून अशी संगीत शाळा सुरू झाल्याने उदयोन्मुख कलाकारांना दिशा मिळेल, असे प्रतिपादन माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.
शाहिर संजय जाधव यांनी सुरु केलेल्या स्वरांश संगीत क्लासेसचे उद्घाटन माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांचे हस्ते आणि मध्यवर्ती हातमाग विणकर महासंघाचे चेअरमन प्रकाश दत्तवाडे व यशवंत प्रोसेसचे चेअरमन अहमद मुजावर यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. मध्यवर्ती हातमाग विणकर संघाच्या जागेत हा क्लास सुरु झाला असून या क्लासेसमध्ये चित्रपटातील गाणी शिकवली जातील. तसेच कराओके गीत, हार्मोनियम, तबला आदी वाद्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्वागत व प्रास्ताविक शाहिर संजय जाधव यांनी केले.
याप्रसंगी इचलकरंजी डान्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल पोवार, हार्मोनियम प्रशिक्षक अतुल पाटील, तबला प्रशिक्षक पवन होदलूर, कराओके प्रशिक्षिका केतकी पाटील, काजल तोडकर आदी मान्यवर उपस्थित होते. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 9850833128 या क्रमांकावर संपर्क साधावा.