![]()
आजरा तालुका प्रतिनिधी – राजाराम कांबळे
वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांना निर्माण झालेल्या समस्या निराकरणासाठी गेल्या सहा ते सात महिन्यापासून आजरा, गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड या तालुक्यांमध्ये निरंतर बहुजन मुक्ती पार्टीचे आंदोलन सुरू असून यामध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने निवेदन देणे, धरणे प्रदर्शन करणे, शहर बंद करणे यासारखी टप्प्याटप्प्याने आंदोलने केली. नेतृत्व डॉ. सुदाम हरेर, राहुल मोरे, अमित सुळेकर,मार्गदर्शक डॉ. उल्हास त्रिरत्ने , नितीन राऊत, शरद पाटील, सूर्यकांत कांबळे, संदिप दाभिलकर, शेखर देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले.
आजऱ्यातील जे शेतकरी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जखमी अथवा मृत्यू झाले त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना सरकारने नुकसान भरपाई दिली. याशिवाय सोलर फेन्सिंग म्हणजे सौर कुंपण सबसिडी 25% होती ती वाढवून 75% पर्यंत नेली. परंतु बहुजन मुक्ती पार्टी ही तडजोड करणारी पार्टी नाही, तर जोपर्यंत कायमची उपाययोजनेची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत लढा देणार असल्याचे सांगितले. बहुजन मुक्ती पार्टीची मुख्य मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हा लढा पूर्ण होणार नाही. आता बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने एक लाख लोकांच्या सह्यांचे निवेदन जिल्हा वनसंरक्षक, जिल्हाधिकारी, वनमंत्री व पालकमंत्री यांना देणार असल्याचे डॉ. उल्हास त्रिरत्ने यांनी सांगितले. त्याची सुरुवात काल पासून मलिग्रे ता. आजरा या गावापासून करण्यात आली.मलिग्रे गावातील ग्रामस्थांनी बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खूप चांगले स्वागत केले व लगेचच सह्यांच्या अभियानात सहभाग घेतला.
यावेळी संजय घाटगे, आप्पा नेसरकर,शिवाजी भगुत्रे, विश्वास बुगडे, बाबु सावंत, वामन दरेकर. सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

