वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत आरोग्य शिबीर संपन्न

Loading

श्री गणेशा आरोग्याचा” मोहिमे अंतर्गत उपक्रम 

आजरा : राजाराम कांबळे

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी मार्फत “श्री गणेशा आरोग्याचा” या मोहिमेअंतर्गत विविध गावांमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले . 
शिबिरांमध्ये नागरिकांना आधार व गोल्डन कार्ड नोंदणी, नेत्रदान व अवयव दान जनजागृती, तसेच कुष्ठरोग, क्षयरोग, जलजन्य व किटकजन्य आजारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. जी. गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी करून सल्ला व उपचार उपलब्ध करून देण्यात आले.

दरम्यान या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये आरोग्य जागरूकता वाढून निरोगी समाजाची दिशा ठळकपणे अधोरेखित झाली.  या उपक्रमाच्या यशासाठी शिरसंगी, दाभिल, कासार कांडगाव, पारेवाडी, वेळवटी, गवसे व पोळगाव उपकेंद्रांचा सक्रिय सहभाग राहिला. शिबिरांच्या आयोजनासाठी आरोग्य निरीक्षक, आरोग्य सहाय्यक/ सहायिका व आरोग्य सेवक/सेविका यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *