![]()
प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत
यड्राव : प्रतिनिधी
”विद्यार्थ्यांना स्वत:च्या अस्तीत्वाची जाणीव करुन देणारा पॅटर्न म्हणजे ‘शरद पॅटर्न’ आहे. यामध्ये शिक्षण, उद्योगाची धडे तर दिले जातातच त्याआधी संस्काराची धडे दिली जातत. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रचंड व सातत्याने कष्ट केले पाहिजे. त्यासोबत नम्रपणा अंगिकार करावे.” असे प्रतिपादन शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजीचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी केले. ते यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थींच्या स्वागत समारंभात बोलत होते.
श्री. बागणे पुढे म्हणाले, ”विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून हि संस्था वाटचाल करीत आहे म्हणूनच अत्यल्प काळात यशस्वी झाली आहे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान, औद्योगिक पूरक कौशल्ये शिकविण्याबरोबरच महाविद्यालय इंडस्ट्रीयल ट्रेनिंग, इंटर्नशीप, प्रोजेक्ट बेस्ड लर्निग, स्टार्टअप सेंटर, अॅक्टीव्हिटी प्रोग्रॅम, प्रोडक्शन सेंटर, इनोव्हेशन सेंटर, युजी फेलोशिप याच्यासोबत व्हॅप अंतर्गत २८ प्रकारचे अद्यावत कौशल्ये उपलब्ध आहेत. ज्याचा उपयोग स्वत:चा उद्योग उभारण्यासाठी, चांगल्या कंपनीत नोकरी व जीवनात यशस्वी बनण्यासाठी होत आहे.
दरम्यान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बाहुबली संगमे यांनी महाविद्यालयाची माहिती दिली. तसेच पुढील चार वर्षे विद्यार्थ्यांने काय करायचे याचा कानमंत्र दिला. सर्व विभाग प्रमुख यांनी महाविद्यालय व विभागाची माहीती दिली. यावेळी प्रवेश घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी सर्व डिन, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थीत होते.
स्वागत प्रथमवर्ष विभाग प्रमुख डॉ. एस. वाय. साळुंखे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अपूर्वा बापट, प्रा. कल्याणी जोशी यांनी केले. आभार प्रा. पल्लवी पाटील यानी मानले.


