गणेशोत्सवानिमित्त ध्वनिसह अन्य प्रदर्शनाची जागृती

Loading

अनिल उर्फ पिंटू मगदूम फार्मसी कॉलेजचा वेगळाच उपक्रम

जयसिंगपूर : प्रतिनिधी

येथील अनिल उर्फ पिंटू मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेज, धरणगुत्तीच्या वतीने ध्वनी प्रदूषण व लेझर प्रदूषण या संदर्भात सामाजिक जाणीववेतून जनजागृती रॅली अभियान राबवण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन निटवे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन जयसिंगपूर शहरात रॅली काढली. ‘नो साऊंड नो लेझर’ अशा आशयाचे संदेश घेणाऱ्या फलकांनी लोकांचे लक्ष वेधले. गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक सण साजरे करतेवेळी सामान्य, आजारी असणाऱ्या नागरिकांना ध्वनी व लेझर प्रदूषणाचा त्रास होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे असा संदेश या रॅलीतून देण्यात आला. ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम यांच्या सामाजिक जाणीवेतून प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यापिका कु. मानसी झाडे यांनी हा उपक्रम राबवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

महाविद्यालयातील अध्यापक, अध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *