आता तरी आय पी एस (IPS) बिरदेवाचा मोबाईल सापडणार?

आता तरी आय पी एस (IPS) बिरदेवाचा मोबाईल सापडणार?

Loading

बिरदेव डोणेचा मोबाईल हरवल्याची तक्रार घेतली पोलिसांनी पण आजपर्यंत सापडलाच नाही!

राजाराम कांबळे

नुकताच युपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेचा निकाल लागला. देशभरातून लाखो मुलांनी सर्वस्व पणाला लावलेल्या या परीक्षेत जेमतेम हजारभर विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घातली. कुणी IAS तर कुणी  IPS तर कुणी इतर पदे मेरिटनुसार पटकावली. यातच बिरदेव डोणे 551 व्या क्रमांकाने परीक्षा उत्तीर्ण झाला आणि IPS पदाला त्याने गवसणी घातली. या बिरदेवाचा मोबाईल हरवला होता. त्याने पोलिसात तशी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र तत्कालीन यंत्रणेने तक्रार घ्यायला टाळाटाळ केली होती. बिरदेवाचा मोबाईल हरवल्याची तक्रार दाखल झाली. पण बहुतेक आजपर्यंत मोबाईल सापडलाच नाही असे समजते. आता प्रश्न असा उपस्थित होतोय कि आता तरी या बिरदेवाचा मोबाईल सापडणार काय? य प्रश्नाची चर्चा कागल तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात सूरु आहे.बिरदेव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका मेंढपाळाचा मुलगा. हुशार पण घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. बिरदेव चा यशाचा शोध चालूच होता तो आज संपला. हा आय पी एस चा निकाल लागला त्यादिवशी त्यामुळे मेंढरे घेउन माळावर चारत होता. दुष्काळात तेरावा महिना तसा बिरदेव चा मोबाईल काही दिवसांपूर्वी पुण्यात हरवला. बिरदेव पोलीस तक्रार द्यावी म्हणून पोलिसात गेला. पोलिसांनी तक्रार घ्यायला टाळाटाळ केली.बिरदेव ने प्रशिक्षणाला गेलेल्या मित्रांच्या मदतीने पोलीस तक्रार नोंदवली. तक्रार घ्यायलाच टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांनी तक्रार घेतली पण अजून फोन काही सापडला नाही. बिरदेव अधूनमधून फोन सापडला का विचारायला पोलीस स्टेशनला जात होता, तेव्हा तपास चालू आहे, सापडला की कळवू हे ठराविक साच्याचे उत्तर बिरदेव ला मिळत होते. हाच बिरदेव आज भारतीय पोलीस सेवेच्या सर्वात उच्च पदासाठी निवडला गेला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *