आमदार शिवाजीराव पाटील यांनी मतदार संघाच्या विकासासाठी वाहून घेतले

Loading

चंदगड मतदारसंघाच्या विकासाला आणि त्यांच्या भावी राजकीय वाटचालीला हार्दिक शुभेच्छा

चंदगड : तातोबा गावडा

आमदार शिवाजीराव पाटील यांची ओळख राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय, भाजपचे एकनिष्ठ अशी असून त्यांनी चंदगड, गडहिंग्लजसह आजरा तालुक्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवली आहे. मुख्यमंत्र्यांशी असलेली जवळीक, प्रशासनावरची पकड आणि केंद्र, राज्य सरकारच्या माध्यमातून चंदगड मतदारसंघाचा आमदार शिवाजीराव पाटील नक्कीच कायापालट करतील असा विश्वास वाटतो. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चंदगड मतदारसंघाच्या विकासाला आणि त्यांच्या भावी राजकीय वाटचालीला हार्दिक शुभेच्छा!

मतदार संघात विकास म्हणजे काय हे दाखवून देण्यासाठी चंदगड विकासाची दूरदृष्टी घेऊन आमदार शिवाजीराव पाटील यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. चंदगडसह आजरा आणि गडहिंग्लज तालुक्याचा कायापालट करायचा असेल तर उद्योग, रोजगार, आरोग्य, शिक्षण याबरोबरच पर्यटन विकास ही काळाची गरज आहे. त्यासाठी मंत्रालयापासून ते गाव वाड्यावस्त्यांपर्यंत जाऊन काम करण्याची गरज आहे. आमदार शिवाजीराव पाटील नक्कीच विकसित चंदगड करून दाखवतील यात शंका नाही. आजपर्यंतचा सर्वाधिक जनाधार मिळून ते चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून निवडूनही आले. कित्येक वर्षं प्रलंबित हेरे सरंजाम प्रश्न, धनगर वाड्याची दुर्दशा, आरोग्य, शिक्षणाची बिकट वाट, एमआयडीसी च्या माध्यमातून उद्योग, व्यवसाय, रोजगार, शक्तीपीठ, बेळगांव-वेंगुर्ला महामार्ग यावर त्यांनी नियोजनबध्द प्रयत्न सुरू केले. विशेष म्हणजे चंदगडचा निसर्ग, पर्यावरण जपत पर्यटन विकास साधण्याचा ध्यास त्यांनी गेली कित्येक वर्ष घेतला आहे. त्यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत.

चंदगड तालुक्याला दुर्गम, मागास म्हणून कायमच कमी लेखले जात आहे. राज्याचे शेवटचे टोक म्हणून कायम दुर्लक्ष आहे. मात्र, शिवाजीराव पाटील यांची मतदारसंघात एंट्री झाली आणि विकासाची दारे खुली झाली आहेत. त्यांनी या भागाच्या विकासाचे स्वप्न पाहिले आहे, इतकेच नाही तर त्यासाठीची ब्ल्यू प्रिंट देखील तयार केली आहे. विशेषतः युवा वर्गाने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला असून त्यांना विधिमंडळात पाठवले आहे. त्यांच्या माध्यमातून नक्कीच चंदगडचा चेहरामोहरा बदलेल असा विश्वास सर्वांना आहे. आमदार शिवाजीराव पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *