बौद्ध तरुणास अमानुष मारहाण : आजरा तालुक्यात संतप्त पडसाद

बौद्ध तरुणास अमानुष मारहाण : आजरा तालुक्यात संतप्त पडसाद

Loading

हल्लेखोरांवर ऍट्रॉसिटी नुसार कडक कारवाईची मागणी

आजरा : प्रतिनिधी-

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील गावातील एका बौद्ध तरुणास जात आणि धर्म विचारून, निर्वस्त्र करून अमानुषपणे मारहाण झाल्याचा घटनेचे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात संतप्त पडसाद उमटत आहेत. हल्लेखोरांवर ऍट्रॉसिटीच गुन्हा नोंद करावा आणि कडक कारवाई करण्याची मागणी आजरा तालुका रिपब्लिकन सेनेने केली. तहसीलदार समीर माने आणि आजरा पोलीस ठाणे यांना तसे निवेदन देण्यात आले.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव या गावात राहणाऱ्या एका बौद्ध तरुणांस गाय चोरीच्या संशयावरून धर्म विचारून निर्वस्त्र करून मारहाण केली. मारहाणीमध्ये या तरुणाचे नाकाचे हाड मोडले, एका डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याने डोळा निकामी झाला. तेव्हा या गुन्ह्यामध्ये जे कोणी गुन्हेगार असतील त्यांच्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कडक कारवाई करून आरोपीना अटक करावी आणि कठोरात कठोर शासन करावे, जेणेकरून यानंतर पुन्हा असे गैरकृत्य घडणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी या आशयाचे निवेदन आहे.

तर या कारवाईस दिरंगाई होऊन न्याय मिळाला नाही तर निषेध आंदोलनाचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर अविनाश कांबळे (तालुका युवाध्यक्ष), विजय कांबळे (तालुकाध्यक्ष), गोपाळ होण्याळकर (तालुका उपाध्यक्ष), परशुराम कांबळे (तालुका संपर्क प्रमुख), नंदकुमार कांबळे (तालुका महासचिव), मधुकर कांबळे (तालुका युवा उपाध्यक्ष), संभाजी कांबळे (तालुका सचिव), शामराव कांबळे (सामाजिक कार्यकर्ते), शेखर देशमुख, बाबासो कांबळे, अमित सुळेकर, अरुण कांबळे, अनिल प्रधान, राहुल मोरे, दौलती कांबळे, धनाजी कांबळे, अशोक कांबळे, रोशन कांबळे, संजय कांबळे, नितीन राऊत,उत्तम कांबळे आदींच्या सह्या आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *