भेटवस्तू नाही : फक्त शुभेच्छा स्वीकारणार

Loading

आमदार शिवाजीराव पाटील यांचा उद्या बुधवारी वाढदिवस

चंदगड : प्रतिनिधी

चंदगड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री.शिवाजी पाटील यांचा उद्या बुधवार दि.३० जुलै २०२५ रोजी वाढदिवस आहे. कार्यकर्त्यांसह सर्वांच्या फक्त ते शुभेच्छा स्वीकारतील. शुभेच्छा देताना भेटवस्तू कोणीही आणू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. सकाळी ग्रामदेवतेचे दर्शन आणि घरगुती कार्यक्रम पार पडल्यानंतर आ.पाटील हे स्वराज्य मल्टिपर्पज हॉल, पाटणे फाटा ता. चंदगड येथे दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती ईनाम सावर्डे येथील मध्यवर्ती भाजपा कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.

प्रसिद्धीपत्रकात पुढे दिलेल्या माहितीनुसार आ.पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली आहे की शुभेच्छा देण्यासाठी येताना कोणीही हार-तुरे, शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेटवस्तू, वह्या आणू नयेत. फक्त शुभेच्छा आणि आशीर्वाद स्विकारले जातील असे त्यांनी सांगितले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *